संस्थेची ओळख

श्री नृसिंहसरस्वती स्वामी महाराज अर्थात श्री दत्तगुरु यांची योग परंपरा ही अतिशय श्रेष्ठ, शुद्ध, तपस्वी व शाश्वत परंपरा मानली जाते. श्री नृसिंहसरस्वती महाराज हे दत्तात्रेयांचा द्वितीय अवतार आहेत. हा मार्ग सतआचरण, तप, संयम, पवित्रता आणि गुरुभक्तीचा सर्वोच्च मार्ग आहे. या मार्गावर चालण्यासाठी साधकाला सांप्रत आचरण, नित्य साधना, आणि गुरुवचनपालन हे अत्यावश्यक असते. श्री. दत्तगुरु योग संप्रदाय ट्रस्टचे कार्य हे सेवा, साधना, समर्पण या त्रिसूत्रीवर आधारलेले आहे. या कार्याचे घोषवाक्य धर्मो सदा विजयते। आत्म-तत्व बोध सदा विजयते। हे असून त्याचा अर्थ असा की, सत्य, न्याय, आणि विधायक कर्तव्याच्या हेतूने जे लोक कर्म करतात तेच शेवटी यशस्वी होतात, कारण आत्मतत्व हेच चिरकाल टिकणारे आहे. जी व्यक्ती स्वतःच्या आत्म्याचे, म्हणजेच आपल्या शाश्वत स्वरूपाचे ज्ञान प्राप्त करतात, ते अज्ञान, भय, व आसक्तींपासून मुक्त होऊन अंतिमतः विजयी होतात.

श्री दत्तगुरु योग संप्रदाय ट्रस्ट हा एक कायदेशीर नोंदणीकृत न्यास असून श्री. दत्तगुरु योग संप्रदाय निर्गुण मठाच्या द्वारे अध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य व पर्यावरणविषयक कार्य करीत आहे. संस्थेचा उद्देश श्री दत्तगुरुंच्या अध्यात्मिक विचारांचा प्रसार, भारतीय संस्कृतीचे संवर्धन, समाजकल्याणकारी उपक्रमांची अंमलबजावणी व गरजूंसाठी सहाय्य करणे हा आहे.

श्री नृसिंहसरस्वती स्वामी महाराज अर्थात श्री दत्तगुरु यांची योग परंपरा ही अतिशय श्रेष्ठ, शुद्ध, तपस्वी व शाश्वत परंपरा मानली जाते. श्री नृसिंहसरस्वती महाराज हे दत्तात्रेयांचा द्वितीय अवतार आहेत. हा मार्ग सतआचरण, तप, संयम, पवित्रता आणि गुरुभक्तीचा सर्वोच्च मार्ग आहे. या मार्गावर चालण्यासाठी साधकाला सांप्रत आचरण, नित्य साधना, आणि गुरुवचनपालन हे अत्यावश्यक असते. श्री. दत्तगुरु योग संप्रदाय ट्रस्टचे कार्य हे सेवा, साधना, समर्पण या त्रिसूत्रीवर आधारलेले आहे.

या कार्याचे घोषवाक्य धर्मो सदा विजयते। आत्म-तत्व बोध सदा विजयते। हे असून त्याचा अर्थ असा की, सत्य, न्याय, आणि विधायक कर्तव्याच्या हेतूने जे लोक कर्म करतात तेच शेवटी यशस्वी होतात, कारण आत्मतत्व हेच चिरकाल टिकणारे आहे. जी व्यक्ती स्वतःच्या आत्म्याचे, म्हणजेच आपल्या शाश्वत स्वरूपाचे ज्ञान प्राप्त करतात, ते अज्ञान, भय, व आसक्तींपासून मुक्त होऊन अंतिमतः विजयी होतात.

श्री दत्तगुरु योग संप्रदाय ट्रस्ट हा एक कायदेशीर नोंदणीकृत न्यास असून श्री. दत्तगुरु योग संप्रदाय निर्गुण मठाच्या द्वारे अध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य व पर्यावरणविषयक कार्य करीत आहे. संस्थेचा उद्देश श्री दत्तगुरुंच्या अध्यात्मिक विचारांचा प्रसार, भारतीय संस्कृतीचे संवर्धन, समाजकल्याणकारी उपक्रमांची अंमलबजावणी व गरजूंसाठी सहाय्य करणे हा आहे.

© २०२५ श्री. दत्तगुरु योग संप्रदाय ट्रस्ट, (रजि.) | डिझाइन व विकास : निनाद वेब टेक